महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले होते . इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
महापरिनिर्वाण म्हणजे काय?
महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दशः अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन फोटो (Mahaparinirvana Day Photo)
|
महापरिनिर्वाण दिन फोटो |
|
महापरिनिर्वाण दिन फोटो |
महापरिनिर्वाण दिन फोटो
|
महापरिनिर्वाण दिन फोटो |
|
महापरिनिर्वाण दिन फोटो |