पुणे, ०६ ऑगस्ट २०२५: वाकड परिसरात एका सिक्युरिटी गार्डला 'घरबसल्या पैसे मिळवण्याची' खोटी स्वप्ने दाखवून तब्बल ६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने गार्डच्या कागदपत्रांचा वापर करून त्याच्या नावावर नवीन कार खरेदी केली.
नेमकी काय घडली घटना?
हा गुन्हा ऑगस्ट २०२४ पासून आजपर्यंत सुरू होता. थेरगाव येथील साई इंडिया पार्क, संतोष नगर येथे फिर्यादी जयाजीराव दामोदर शिंदे (वय ६४, धंदा-सिक्युरिटी गार्ड) हे नोकरी करत होते. तिथेच आरोपी संदेश संकेत जुंद्रे (वय ३५, रा. मुंबई) भाड्याने राहायला आला.
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी ताई । Rakshabandhan Wishes for Brother in Marathi
संदेश जुंद्रेने फिर्यादी जयाजीराव यांच्याशी गप्पा मारून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचे वय ६३ वर्षे असल्याचे कळल्यावर त्याने त्यांना, "या वयात काम होते का, तुम्हाला घरबसल्या दररोज पैसे मिळतील अशी सोय करतो," असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जयाजीराव यांनी त्याला आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिले.
या कागदपत्रांचा वापर करून, आरोपीने जयाजीराव यांच्या नावावर एक एअरटेलचे सिम कार्ड घेतले, जे त्याने स्वतःच्या फोनमध्ये वापरले. त्यानंतर याच कागदपत्रांचा वापर करून त्याने जयाजीराव यांच्या नावाने बँकेत खाते उघडले, क्रेडिट कार्ड काढले आणि डिजिटल केवायसीही पूर्ण करून घेतले.
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी ताई । Rakshabandhan Wishes for Brother in Marathi
त्यानंतर आरोपीने या सर्व कागदपत्रांचा उपयोग करून सह्याद्री मोटर्स, बाणेर येथून कार क्रमांक २५ एक्त ३६४० ए ही चारचाकी कार खरेदी केली. अशा प्रकारे, त्याने जयाजीराव यांची ६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३८, ३३६(३), ३४०(१), ३४०(२), ३१६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संदेश जुंद्रे अद्याप फरार असून, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशा प्रकारे विश्वास संपादन करून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.